"जीवन-रेखा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपले स्वागत आहे"
व्यसन म्हणजे एखादी अशी सवय की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असूनही त्यात बदल करणे शक्य होत नाही.
व्यसन हे एक विनाशकारी वादळ आहे. या वादळात आज आपल्या देशातील युवा पिढी अडकलेली आहे. या विनाशकारी वादळाला आत्ताच जर थांबवले नाही तर कितीतरी कोवळे युवक आणि युवती नव्या शतकाच्या पहिल्या उगवता सूर्य बघण्यासाठी शिल्लकच राहणार नाहीत. तेंव्हा मित्रहो सावध व्हा. आता तरी जागे व्हा आणि या देशाला विनाशक मार्गांकडे जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करा.
मेंदूला बधिर करणाऱ्या कोणत्याही मादक पदार्थाचे म्हणजेच तंबाखू, सिगारेट, दारू, गांजा, चरस, झोपेच्या गोळ्या इ. अशा प्रकारच्या कोणत्याही पदार्थाचे अतिरेकी सेवन करणाऱ्या व्यक्तीला व्यसनी ही पदवी प्राप्त होते. आप्तपरिवार, मित्रमंडळी अशा अगणित कुटुंबांना दुःखात लोटत असते. मुख्य म्हणजे याची जाणीव त्याला असली तरी त्याचा नाईलाज असतो. इतका तो व्यसनाच्या आहारी जाऊन हतबल झालेला असतो. त्यालाच म्हणायचे व्यसनापायी ओढून घेतलेली मानसिक गुलामगिरी.
या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यावर या विनाशकारी वादळाची तीव्रता किती भयंकर आहे हे कळते. फक्त इच्छाशक्तीच्या बळावर दारू सुटू शकत नाही. त्याला योग्य प्रयत्नांची जोड, योग्य मार्गदर्शन तसेच योग्य औषधोपचार यांची साथ हवी.
व्यसनमुक्ती... एकविसाव्या शतकाची कळकळीची हाक.
कोणताही व्यक्ती व्यसनी होण्याचे मुख्य कारण म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता, इच्छा शक्तीचा अभाव, बऱ्याच वेळा कर्जवाढ, घरगुती कलह, लहान वयात असताना लायकी पेक्षा जास्त मिळालेली धनसंपत्ती हे सुद्धा व्यसनाधीनतेचे कारणे असू शकतात.
सधन व्यावसायिक, निरनिराळे अधिकारी आणि शाळा कॉलेजातील विद्यार्थी केवळ फॅशन म्हणून या दुष्टचक्रात स्वतःला अडकून घेतात. वेळी जर त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ती आश्चर्यकारक गतीने व्यसनाधीनतेच्या आहारी जातील.
इतर मानसिक रोगाप्रमाणे हा देखील एक मानसिक रोग आहे. कालांतराने नशेमुळे मनो-सामाजिक असे वाईट अनुभवच यायला लागतात. त्या पदार्थाविना व्यक्तीला आयुष्य जगणे अशक्य होते. नंतर मग ही व्यक्ती त्रास जास्त त्रासू लागते. त्यांना या अस्वस्थापणातुन बाहेर पडणे कठीण जाते. त्यामुळे ती व्यक्ती नशेच्या विळाख्यात अधिक गुंतत जाते.
हा आजार बरा करण्यासाठी लवकरात लवकर त्या व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रात भरती करणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात व्यसन थांबवताना जे काही शारीरिक व मानसिक तडफड होते त्यावर योग्य ते औषधोपचार व्यसनमुक्तीकेंद्रातूनच शक्य आहे.
व्यसनाधीन व्यक्तीला शक्य तितक्या लवकर एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात भरती करणे हाच उपचार खऱ्या अर्थाने प्रभावी आहे.
कारण घरात राहून एखाद्याचे स्वातंत्र्य नष्ट करणे वाटते तितके सोपे नाही. त्याची मित्र संगत तोडणे. चालू वातावरणात संपूर्ण बदल करणे, प्रसंगी कठोर वागणे आणि रोग्यास त्याच्या व्यसनापासून दूर ठेवणे फक्त व्यसनमुक्ती केंद्रातच शक्य आहे.
व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णाला मनन करण्याची, पश्चातापाची संधी मिळते. स्वतःसाठी वेळ मिळतो. सतत व्यसनाधीन असल्याने असा वेळ त्याला कधी मिळालेला नसतो. या कालावधीत रुग्णाचे मन परिवर्तन करण्यात मदत होते. त्याला चांगले आणि वाईट यातील फरक तज्ञ व्यक्तींकडून समजावून सांगितला जातो. औषधाबरोबरच त्याची दिनचर्या चाकोरीबद्ध केली जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे अंमली पदार्थ न मिळाल्याने पहिल्या आठवड्यातच रुग्णाला त्रास सुरू होतो. अशा त्रासाला Withdrawal Symptoms असे म्हणतात. अशावेळी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णावर उपचार केले जातात.
व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनी व्यक्ती समजून घेऊन, त्याला व्यसन सोडायचे प्रेरणा दिली जाते. शिवाय त्या व्यक्तीची परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता वाढवली जाते. दवाखान्यात भरती करणे हा रामबाण उपाय नाही हे जरी खरे असले, तरी या काळात त्यांचे मनपरिवर्तन करण्यास मदत होते. पण सर्वात मुख्य म्हणजे सुरुवातीच्या आठवड्यातच व्यक्तीला व्यसनी पदार्थ न मिळाल्याने जो त्रास होतो तो घरातील लोकांना बघवत नाही, अशा त्रासाला Withdrawal असे म्हणतात. हा त्रास रोग्याने सहन करणे भागच आहे. तज्ञ डॉक्टर अशा रोग्याला हाताळू शकतात. व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णाला पूर्ण तपासले जाते. अगदी शारीरिक व्याधीपासून ते मानसिक व्याधीपर्यंत. तसेच, आवश्यकतेनुसार वैयक्तिक, कौटुंबिक व वैवाहिक सल्ला किंवा काऊन्सेलिंग केली जाते.
© Copyrights 2024 Jeevan-Reka De-addiction Center. Designed and Developed by Idhi Technologies