"जीवन-रेखा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपले स्वागत आहे"
जीवन-रेखा प्रतिष्ठान लातूर या संस्थेचे संस्थेची सुरुवात १९९४ साली झाली. संस्था सुरू करण्याचा मूळ उद्देश वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत कुशल तत्रज्ञाची असणारी कमी पडून काढणे अर्थात वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सि. टी. स्कॅन तंत्रज्ञ अशा पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून तरुणांना रोजगार-स्वयंरोजगार-नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे व वैद्यकीय क्षेत्राची असणारी तत्रज्ञाची कमी भरून काढणे हा होता.
तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठीच्या उपाययोजना करणे जसे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू करून देणे, शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योग सुरू करून देणे हा होय.
ग्रामीण भागात आज विविध ग्रामीण विकास, महिला बचत गट, शेतीविषयक योजना राबवत असताना तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आढळून आले आहे. माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचे व्हिजन या प्रबंधात प्रगतिशील व मोठ्या देशांमध्ये, जगामध्ये ज्या देशाची नोंद घेतली जाईल त्यात भारताचे नाव अग्रगण्याने घेतले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
पण प्रत्यक्षात तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन १९९९ साली जीवन रेखा व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली. आजपर्यंत जवळपास १७,000 लोकांनी या केंद्रात उपचार घेतलेले असून, आज ते सामान्य जेवण जगात आहेत. तसेच, ते आमच्या केंद्राचे नावलौकिक करत आहेत.
© Copyrights 2023 Jeevan-Reka De-addiction Center. Designed and Developed by Idhi Technologies