"जीवन-रेखा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपले स्वागत आहे"
व्यसनाधीनतेच्या उपचारांतर्गत विविध उपाययोजना असतात. ज्यामध्ये
काही
औषधोपचाराने व्यसनी व्यक्तीच्या शरीरातील अल्कोहल / निकोटीन इत्यादी पदार्थांचे
प्रमाण कमी केले जाते त्याला Detoxification असे म्हणतात. काही कालावधीनंतर
पुन्हा व्यसनाची ओढ जाणवते याला Craving असे म्हणतात. ते कमी करण्यासाठी इतर
औषधे वापरली जातात.
सदरहू कालावधीत रुग्णाच्या शारीरिक अवस्थेत सूक्ष्म पण चांगले बदल करत असतानाच
त्यास समुपदेशनासाठी Counselling जोड दिली जाते. समुपदेशनात अयोग्य व योग्य
विचार, योग्य व योग्य वर्तन, भावनांचे नियमन इत्यादी गोष्टींवर भर दिला
जातो.
समुपदेशनात स्वतःची व कुटुंबाची काळजी कशी घ्यायची, आपले सामाजिक स्वास्थ्य कसे
सुधरायचे, आपल्या होणाऱ्या चांगल्या परिवर्तनास कसे सामोरे जायचे व आपल्यामधील
होणारा सुयोग्य बदल कसा टिकवायचा याबाबत मार्गदर्शन केले जाते.
व्यसनाधीन व्यक्तीला शक्य तितक्या लवकर एखाद्या व्यसनमुक्ती
केंद्रात भरती करणे हाच उपाय खऱ्या अर्थाने प्रभावी आहे. कारण घरात राहून
एखाद्याचे स्वातंत्र्य नष्ट करणे वाटते तितके सोपे नाही. त्याची मित्र संगत
तोडणे. चालू वातावरणात संपूर्ण बदल करणे, प्रसंगी कठोर वागणे आणि रोग्यास
त्याच्या व्यसनापासून दूर ठेवणे फक्त व्यसनमुक्ती केंद्रातच शक्य आहे.
व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णाला मनन करण्याची, पश्चातापाची संधी मिळते.
स्वतःसाठी वेळ मिळतो. सतत व्यसनाधीन असल्याने असा वेळ त्याला कधी मिळालेला
नसतो. या कालावधीत रुग्णाचे मन परिवर्तन करण्यात मदत होते. त्याला चांगले आणि
वाईट यातील फरक तज्ञ व्यक्तींकडून समजावून सांगितला जातो. औषधाबरोबरच त्याची
दिनचर्या चाकोरीबद्ध केली जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे अंमली पदार्थ न
मिळाल्याने पहिल्या आठवड्यातच रुग्णाला त्रास सुरू होतो. अशा त्रासाला
Withdrawal Symptoms असे म्हणतात.
अशावेळी तज्ञ डॉक्टरांच्या
मार्गदर्शनाखाली
व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णावर उपचार केले जातात. त्याचबरोबर व्यसनमुक्ती
केंद्रांमध्ये राहिल्याने स्वतःसारख्याच कितीतरी व्यसनाने पीडित व्यक्तींशी
संपर्क येतो व त्यातून चांगल्या वाईट अनुभवांची देवाणघेवाण होते. योग्य
मार्गदर्शन व समुपदेशनाने व्यसनमुक्त आयुष्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन
मिळतो.
बहुतांशी वेळेला व्यसनमुक्ती केंद्राकडे बघण्याचा दृष्टिकोन
म्हणजे फक्त व्यसनी
व्यक्तीला व्यसनमुक्त करायची जागा एवढाच असतो. पण जीवन-रेखा त्याही पलीकडे जाऊन
व्यसनी व्यक्तीला व्यसनी पदार्थांपासून दूर ठेवण्याबरोबरच, त्याला स्वतःच्या
चांगल्या व योग्य गुणांची ओळख करून द्यायचा प्रयत्न करते. समाजात त्याचे स्थान
पुन्हा सबख करून देण्यास मदत करते.
जीवन रेखा व्यसनमुक्ती केंद्र, व्यसनी
व्यक्तीचे उध्वस्त कुटुंब पुन्हा सावरण्यास पूर्णतः मदत करते. आमची लढाई व्यसनी
व्यक्तीशी नाही तर व्यसनाशी आहे, असे मानून व्यसनी व्यक्तीच्या पूर्ण कुटुंबात
कोणत्याही प्रसंगात समर्थपणे सामोरे जाण्यास जीवन-रेखा व्यसनमुक्ती केंद्र
मार्गदर्शन करते.
अंमली पदार्थाचा मुख्यतत्वे करून दुष्परिणाम हा शरीराच्या
लिव्हर, ह्रदय, किडणी, फुफ्फुस, मेंदू इत्यादी महत्त्वाच्या अवयवांवर होतो.
व्यसनमुक्ती केंद्रात ॲडमिट केल्यानंतर बऱ्याच दिवसांपासून चालू असलेल्या
व्यसनांच्या शारीरिक दुष्परिणाम ओळखण्यासाठी Hb, CBC, LFT, KFT, ECG, BSL, USG,
ABDOMEN इत्यादी विविध तपासण्या कराव्या लागतात.
सदरहू तपासाअंती जे
निष्कर्ष
येतात त्यावर शारीरिक स्थिती सुधारण्यासाठी व व्यसनाधीनतेची ओढ कमी
करण्यासाठीची उपाययोजना आखली जाते.
ए. ए. म्हणजे अल्कोहोलीक्स अनॉमिनस, ही संघटना या जगातील पहिला
स्व-मदत गट आहे. या गटामध्ये दारू पासून लांब राहिलेली माणसे आपले
व्यसनमुक्तीचे अनुभव कथन करतात. त्यामुळे व्यसनी माणसांना व्यसनमुक्त करण्याची
प्रेरणा मिळते.
ते आयुष्यभर एकमेकांच्या संपर्कात राहतात. केवळ स्वतःसाठी
नव्हे
तर आपण जसे या आजाराला काबूत करायला शिकलो तसे इतरांनी ही शिकावं यासाठी सर्व
सदस्य सतत प्रयत्नशील असतात. या संघटनेत सभासदाची इच्छा असली पाहिजे.
सोबर राहणे म्हणजे मद्यमुक्त किंवा व्यसनमुक्त राहणे होय. आपण व्यसनाच्या अधीन गेलो आहोत. आपल्याला व्यसनाचा आजार झाला आहे हे समजल्यावर योग्य औषधोपचार घेऊन व्यसनापासून दूर राहणे म्हणजे सोबर राहणे. सोबर राहून व्यसनी व्यक्ती पुन्हा एकदा नव्याने आयुष्याचा आस्वाद घेऊ शकतो.
हजारो इतर व्यक्तींप्रमाणे तुमच्या कुटुंबातील व्यसनी व्यक्तीही स्वःताच्या व्यसनमुक्त राहण्याच्या प्रामाणिक इच्छेने, कुटूंबाच्या भावनिक आधाराने व व्यसनमुक्ती केंद्रातील योग्य उपचाराने पुन्हा नवं आनंदी जीवन जगू शकते.
© Copyrights 2024 Jeevan-Reka De-addiction Center. Designed and Developed by Idhi Technologies