"जीवन-रेखा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपले स्वागत आहे"
व्यसनाधिनता हा एक मानसिक आजार आहे. व्यसनी व्यक्तीला त्याचा आजार समजावून सांगून, यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना व्यसन सोडायची प्रेरणा जीवन रेखा प्रतिष्ठान संचलित व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दिले जाते.
सुरुवातीच्या आठवड्यात व्यक्तीला व्यसनी पदार्थ न मिळाल्याने त्रास होतो त्याला Withdrawal असे म्हणतात. अशा वेळी व्यवस्थित औषधोपचार होणे खूप गरजेचे असते. केंद्रामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे औषधोपचार केले जातात.
व्यसनाधीन लोकांना समुपदेशन खूप गरजेचे असते. केंद्रामध्ये समुपदेशनद्वारे रुग्णांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली जाते. संवाद, सुसंवाद करून त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवला जातो.
व्यसनाच्या आधिन गेल्यामुळे रुग्ण हा कुटुंबापासून दूर जातो. त्यामुळे आवश्यकतेनुसार त्यांना वैयक्तिक, कौटुंबिक, तसेच वैवाहिक सल्ला देऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांना निरोगी सुखी व समाधानी आयुष्याचे स्वप्न दाखवले जाते.
जीवन रेखा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दररोज रुग्णांकडून एकत्रितपणे एक प्रार्थना म्हणून घेतली जाते. हि खास व्यसनाधीन रुग्णांसाठी लिहिलेली प्रार्थना आहे. या प्रार्थनामध्ये जो सार आहे त्यामुळे कळत नकळत रुग्णांचे मत परिवर्तन होते
व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे रुग्ण हा कुटुंबापासून, समाजापासुन, मित्रमंडळीपासुन दूर लोटला जातो. त्यामुळे तो अधिकच मानसिकरीत्या खचून जातो. केंद्रामध्ये समुपदेशन करून त्याला मनाने सुदृढ, समाधानी बनवले जाते.
जीवन रेखा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दररोज रुग्णांकडून एकत्रितपणे एक प्रार्थना म्हणून घेतली जाते. हि खास व्यसनाधीन रुग्णांसाठी लिहिलेली प्रार्थना आहे. या प्रार्थनामध्ये जो सार आहे त्यामुळे कळत नकळत रुग्णांचे मत परिवर्तन होते
जीवन विकास प्रतिष्ठान संचलित व्यसनमुक्ती केंद्र मध्ये रुग्णांची काळजी घेण्यासोबतच त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात.
व्यसनी रुग्णांना जर केंद्रामध्ये प्रवेश घ्यावयाचा असेल तर फक्त एका फोनवर त्यांच्यासाठी घरापासून ते केंद्रापर्यंतची वाहतुक सुविधा केंद्राने उपलब्ध करून दिलेली आहे
व्यसनाधीन लोकांना वाचनाची गोडी लावून त्यांची ज्ञानार्जनाची व जिज्ञासापूर्तीची नैसर्गिक भूक भागविण्याचे तसेच एक विरंगुळ्याचे कार्य हे केंद्रांमधील सुसज्ज ग्रंथालय करत आहे
केंद्रामधील सर्व निवासी रुग्णांसाठी पौष्टिक आहार पुरवला जातो. जेवणांच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे एकदम चविष्ट, रुचकर व पौष्टिक असे जेवण बनवले जाते. स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते
केंद्रामध्ये रुग्णांसाठी करमणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये टीव्ही, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल इत्यादींचा समावेश केला आहे
केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. येथील सर्व कर्मचारी हे अनुभवी, हुशार, रुग्णांची मनापासून काळजी घेणारे तसेच तत्परतेने रुग्णांच्या अडचणी सोडवणारे आहेत
केंद्रामध्ये प्रवेश घेतलेल्या रुग्णांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी केली जाते. यामध्ये त्यांचे एचबी, बीपी, शुगर इ. वेगवेगळ्या तपासण्या तज्ञ डॉक्टरांकडून केल्या जातात
केंद्रांमध्ये वेगवेगळे सणवार, उत्सव हे मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरे केले जातात. उत्सवाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन या कार्यक्रमांचा आनंद घेतात
© Copyrights 2024 Jeevan-Reka De-addiction Center. Designed and Developed by Idhi Technologies