"जीवन-रेखा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपले स्वागत आहे"

जीवन-रेखा व्यसनमुक्ती केंद्र

१९९९ पासुन व्यसनाने त्रस्त असलेल्या अनेक व्यक्तींना मानसिक, शारिरीक आणि कौटुंबिक समस्येतून बाहेर काढण्यास जीवन-रेखाने मोलाची कामगिरी पार पाडली आहे. असंख्य व्यक्तीच्या दुवा आणि शुभेच्छा यांची शिदोरी बरोबर घेऊन...

व्यायाम व योगा

दररोज सकाळी केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम, योगा, प्राणायाम, सुर्यनमस्कार यांचा तज्ञ व्यतींकडून कार्यक्रम घेतला जातो

२४/७ रुग्ण सेवा

बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची हेळसांड होऊ नये म्हणून जीवन-रेखा व्यसनमुक्ती उपचार केंद्र हे २४/७ चालू असते

मधुर संगीत

केंद्रामध्ये दिवसाची सुरुवात हि मधुर संगीतमय गाण्याने होते. संगीत हे मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. संगीतामुळे वातावरण शुद्ध व प्रसन्न होते

बाहेरचा फेरफटका

आमचे सहकारी दररोज सकाळी सर्व रुग्णांना घेऊन बाहेर फेरफटका मारतात. दररोज किमान १-२ किलोमीटर सर्वजण फिरायला जातात

प्रशंसापत्रे

उत्कृष्ट सेवा

व्यसनाधिनता हा एक मानसिक आजार आहे. व्यसनी व्यक्तीला त्याचा आजार समजावून सांगून, यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना व्यसन सोडायची प्रेरणा जीवन रेखा प्रतिष्ठान संचलित व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दिले जाते.

औषधोपचार

सुरुवातीच्या आठवड्यात व्यक्तीला व्यसनी पदार्थ न मिळाल्याने त्रास होतो त्याला Withdrawal असे म्हणतात. अशा वेळी व्यवस्थित औषधोपचार होणे खूप गरजेचे असते. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे औषधोपचार केले जातात.

समुपदेशन (Counselling)

व्यसनाधीन लोकांना समुपदेशन खूप गरजेचे असते. केंद्रामध्ये समुपदेशनद्वारे रुग्णांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली जाते. संवाद, सुसंवाद करून त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवला जातो.

कौटुंबिक सल्ला

व्यसनाच्या आधिन गेल्यामुळे रुग्ण हा कुटुंबापासून दूर जातो. त्यामुळे आवश्यकतेनुसार त्यांना वैयक्तिक, कौटुंबिक, तसेच वैवाहिक सल्ला देऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांना निरोगी सुखी व समाधानी आयुष्याचे स्वप्न दाखवले जाते.

ग्रुप थेरपी

केंद्रामध्ये रुग्णांचे ग्रुप तयार करून त्यांचे वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. त्यांचा एकमेकांसोबतचा संवाद वाढवून त्यांचे सामाजिक कौशल्य विकसित केले जाते. त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रेरित केले जाते.

मानसिक उपचार

व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे रुग्ण हा कुटुंबापासून, समाजापासुन, मित्रमंडळीपासुन दूर लोटला जातो. त्यामुळे तो अधिकच मानसिकरीत्या खचून जातो. केंद्रामध्ये समुपदेशन करून त्याला मनाने सुदृढ, समाधानी बनवले जाते.

प्रार्थना

जीवन रेखा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दररोज रुग्णांकडून एकत्रितपणे प्रार्थना म्हणून घेतली जाते. हि खास व्यसनाधीन रुग्णांसाठी लिहिलेली प्रार्थना आहे. या प्रार्थनामध्ये जो सार आहे त्यामुळे कळत नकळत रुग्णांचे मत परिवर्तन होते.

आपले काही प्रश्न?

व्यसन म्हणजे एखादी अशी सवय कि ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शारिरीक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असुनही त्यात बदल करणे शक्य होत नाही.

व्यसन हे एक विनाशकारी वादळ आहे. या वादळात अडकलेल्या पिढीला बाहेर काढणे व त्यांना निरोगी, सुखी व समाधानी बनवणे म्हणजे व्यसनमुक्ती होय.

व्यसनमुक्ती केंद्रातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनखालील योग्य औषधोउपचार व तज्ञांकडून दिलेल्या वैयक्तिक, कौटुंबिक व वैवाहिक सल्यामुळे व्यसनी व्यक्ती लवकर बरा होतो.

व्यसनी व्यक्तीचे प्रश्न, समस्या व मानसशास्त्र समजून घेऊन त्यावर पर्याय शोधणे तसेच संवाद-वाद-सुसंवाद करून त्यांची चुकलेली वाट दुरुस्त करण्याचा सल्ला देणे म्हणजे समुपदेशन होय.

अंमली पदार्थ न मिळाल्याने पहिल्या आठवड्यात रुग्णाला त्रास सुरु होतो, अशा त्रासाला Withdrawal Symptoms म्हणतात. अशावेळी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णावर उपचार केले जातात.

संस्थेची पार्श्वभूमी

जीवन-रेखा प्रतिष्ठान संचलित व्यसनमुक्ती उपचार केंद्राची सुरुवात १९९९ साली झाली. 1999 पासून व्यसनाने त्रस्त असलेल्या अनेक व्यक्तींना मानसिक आजारातून आणि शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक इत्यादी समस्येतून बाहेर काढण्यास जीवन-रेखाने मोलाची कामगिरी पार पाडली आहे. असंख्य व्यक्तीच्या दुवा आणि शुभेच्छा यांची शिदोरी बरोबर घेऊन...

लातूर येथे व्यसनमुक्ती केंद्र नसल्याने व्यसनाधीन रुग्णांना उपचाराकरिता जिल्ह्याच्या बाहेर जावे लागत होते. ही गैरसोय लक्षात घेऊन जीवन-रेखा व्यसनमुक्ती केंद्र उभारण्यात आले आणि आतापर्यंत 17000 रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे.


Read More

उत्कृष्ट सुविधा

जीवन विकास प्रतिष्ठान संचलित व्यसनमुक्ती केंद्र मध्ये रुग्णांची काळजी घेण्यासोबतच त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात.

वाहतुक सुविधा

व्यसनी रुग्णांना जर केंद्रामध्ये प्रवेश घ्यावयाचा असेल तर फक्त एका फोनवर त्यांच्यासाठी घरापासून ते केंद्रापर्यंतची वाहतुक सुविधा केंद्राने उपलब्ध करून दिलेली आहे

सुसज्ज ग्रंथालय

व्यसनाधीन लोकांना वाचनाची गोडी लावून त्यांची ज्ञानार्जनाची व जिज्ञासापूर्तीची नैसर्गिक भूक भागविण्याचे तसेच एक विरंगुळ्याचे कार्य हे केंद्रांमधील सुसज्ज ग्रंथालय करत आहे

पौष्टिक आहार

केंद्रामधील सर्व निवासी रुग्णांसाठी पौष्टिक आहार पुरवला जातो. जेवणांच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे एकदम चविष्ट, रुचकर व पौष्टिक असे जेवण बनवले जाते. स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते

करमणूक सुविधा

केंद्रामध्ये रुग्णांसाठी करमणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये टीव्ही, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल इत्यादींचा समावेश केला आहे

अनुभवी कर्मचारी

केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. येथील सर्व कर्मचारी हे अनुभवी, हुशार, रुग्णांची मनापासून काळजी घेणारे तसेच तत्परतेने रुग्णांच्या अडचणी सोडवणारे आहेत

वैद्यकीय तपासणी

केंद्रामध्ये प्रवेश घेतलेल्या रुग्णांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी केली जाते. यामध्ये त्यांचे एचबी, बीपी, शुगर इ. वेगवेगळ्या तपासण्या तज्ञ डॉक्टरांकडून केल्या जातात

उत्सव कार्यक्रम

केंद्रांमध्ये वेगवेगळे सणवार, उत्सव हे मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरे केले जातात. उत्सवाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन या कार्यक्रमांचा आनंद घेतात

Happy People

17000

Award

12

Experience

21

Our Staff

15

© Copyrights 2024 Jeevan-Reka De-addiction Center. Designed and Developed by Idhi Technologies